राज्याभिषेक!
भूमीपुत्रांच्या स्वांतत्र्याचा पहिला हुंकार. हिंदूस्थानच्या इतिहासातील सुवर्णदिन.
६जून १६७४रोजी रायगडावर मराठ्यांचे सार्वभौम राज्य स्थापन झाले. शिवाजी महाराज शककर्ते झाले. छत्रपती झाले.
देशाला कर्तृत्वाची नवी अयाम देणारा हा दिवस सर्वांच्यासाठीच अवस्मरणीय आहे.
या दिवसाची सदैव आठवण रहावी, नव्या पिढीला उर्जा मिळावी यासाठी कोल्हापूरचे युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते.
गेल्या दहा वर्षात हा सोहळा लोकोत्सव झालेला आहे. प्रत्येक शहरात, गावागावात, घराघरात हा सोहळा सण म्हणून साजरा केला जातो.
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित असतात.
त्याचा प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष फायदा तेथील स्थानिक मावळ्यांना मोठ्याप्रमाणात झाला आहे. अर्थकारणाला चालना मिळाली असून, स्थानिकांचे राहणीमान उंचावण्यास फार मोठी मदत झाली आहे.